इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
निवडणूक आणि मतदान
एक मतदार मतदानासाठी मतदान केंद्रात आला.
सर्व प्रक्रिया केल्यानंतर तो ईव्हीएम मशिनसमोर गेला.
तेथे तो बराच वेळ उभा राहिला.
ते पाहून मतदान अधिकारी म्हणाले
मतदान अधिकारी – काय झालं? मत कसे द्यायचे माहित आहे ना?
की मशीन पळवून न्यायचे आहे का?
मतदार – नाही सर, असं नाही करणार..
मतदान अधिकारी – मग काय विचार चालू आहे?
व्यक्ती – रात्री कोणत्या पक्षाच्या सदस्याने दारु पाजली तेच आठवतोय.
मला त्यालाच मत द्यायचे आहे, पण, मला तेच आठवत नाहीय.
– हसमुख