इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
डोंबारी आणि हौसा काकू
डोंबारी त्याचे खेळ दाखविण्यासाठी शहरात आलेला असतो. त्याचवेळी तेथे हौसा काकूही येतात. तेव्हा
डोंबारी – या माझ्या माय बापांनो, आता मी तुमच्या समोर कोळसा, काचा, खिळे खाऊन दाखवणार आहे.
प्रेक्षक – अरे व्वा
डोंबारी – मायबाप हो, कृपया, रुपया, दोन रुपया ताटात टाका..
म्हणजे, मला भाकरी खाता येईल.
हौसा काकू – आरं बाबा, एवढं सगळं खाल्ल्यावर
भाकरीसाठी तुझ्या पोटात जागा तरी राहील का…?
– हसमुख