इंडिया दर्पण – हास्य षटकार – डॉक्टर, पती आणि पत्नी
राजारामला बरे नसल्याने त्याची पत्नी सुनंदा त्याला लढे डॉक्टरांकडे घेऊन जाते. तेव्हा
डॉक्टर : तुमच्या पतीला खूप विश्रांतीची गरज आहे.
सुनंदा : का असे काय झाले त्यांना
डॉक्टर : काही नाही. खुप थकवा आहे. या झोपेच्या गोळ्या घ्या
सुनंदा : त्यांना कधी द्यायच्या या गोळ्या
डॉक्टर : या गोळ्या त्यांच्यासाठी नाही, तुमच्यासाठी आहेत.
– हसमुख