इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
डॉक्टरने लिहून दिलेल्या गोळ्या
(हगवणे डॉक्टर आणि खानझोडे पेशंटचा संवाद)
श्री खानझोडे – डॉक्टर साहेब, तुम्ही लिहून दिलेल्या
सर्व गोळ्या मिळाल्या.
पण, ही एक गोळी मिळाली नाही.
डॉ. हगवणे – अहो, त्या गोळ्या नाहीत.
फक्त पेन चालतो आहे की नाही
ते बघण्यासाठी मी ते लिहीलं होतं.
श्री खानझोडे – पण, मेडिकल दुकानदार मला म्हणाला की,
त्या ब्रँडेड कंपनीच्या गोळ्या आहेत.
मागवून देतो मी तुम्हाला
– हसमुख