इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
डॉक्टर आणि वृद्ध महिला
गल्लीत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलेले असते.
त्यात डॉक्टर रुग्णांची तपासणी करीत असतात.
हे डॉक्टर त्याच परिसरात राहणारे असतात.
तेवढ्यात डॉक्टर एका आजारी वृद्ध महिलेला तपासतात…
डॉक्टर – तुमचे तोंड उघडा आजी
वृद्ध महिला – तुझी बायको रोज संध्याकाळी
कंपाडरसोबत गच्चीवर रिल्स बनवते…
डॉक्टर – हे काय बोलताय तुम्ही?
म्हातारी – तूच म्हटलास ना, तोंड उघडा
मी तोंड उघडले…
बाकी तू हुशार आहेस…
(डॉक्टर बेशुद्ध)
– हसमुख