इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सकू आजी आणि डॉक्टर
(सकू आजी आपल्या नातवाला घेऊन डॉक्टरकडे जाते तेव्हा)
डॉक्टर – आजी तुमच्या नातवाच्या डोक्याला टाके घालावे लागतील.
आजी – किती टाके घालावे लागतील?
डॉक्टर – जखम मोठी आहे.
त्यामुळे ४ ते ५ तरी टाके घालावे लागतील
आजी – बरं, किती पैसे होतील?
डॉक्टर – पाचशे रुपये होतील
आजी – काय पाचशे रुपये?
डॉक्टर – हो आजी
आजी – अरे, नाक्यावर वरचा दगडू मोची
अख्ख्या चपलेला टाके घालायचे ५ रुपये घेतो.
– हसमुख