इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मुलगी आणि आई
कॅब्रा डान्स पाहून मुलगी रात्री उशीरा घरी परतते.
आई खुप संतापलेली असते.
आई – एवढा उशीरा घरी आलीस, कुठे होतीस, काळतोंडी?
मुलगी – चिल आई! काब्रा डान्स पाहायला गेली होती…
आई – अरे देवा! काही विचित्र तर पाहिले नाही ना…
मुलगी – हो आई, खूप विचित्र वाटलं…
आई – काय विचित्र वाटतंय…
मुलगी – हाच डान्स पाहण्यासाठी पप्पाही गेले होते.
काही वेळाने नवरा घरी परतला…
पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले
मुलगी चादर घेऊन शांतपणे झोपली…
– हसमुख