इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
दारुड्या आणि साधु बाबा
एक साधु बाबा झाडाखाली बसलेला असतो.
तेवढ्यात तेथे एक दारुड्या येतो.
आणि जोरजोरात गाणी म्हणतो.
साधु बाबा – तू एवढी दारू प्यायलास तर मरशील आणि नरकात जाशील.
दारुड्या – मग जो दारू विकतोय त्याचे काय होणार?
साधु बाबा – तोही नरकात जाईल.
दारुड्या – मग दारूच्या दुकानासमोर जो चखणा विकतो त्याचं काय होणार?
साधु बाबा – त्यालाही नरकात जावे लागेल.
दारुड्या – मग काय प्रॉब्लेम आहे. नरक माझ्यासाठी ठीक आहे…
– हसमुख