इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
कॉलेज आणि गझल
कॉलेजच्या आवारात शऱ्या त्याच्या मित्रांसोबत उभा असतो.
दररोज ते मुलींकडे पाहून कमेंट करतात.
आजही त्यांचा हा उपक्रम सुरू असतो.
त्याचवेळी तेथून एक सुंदर तरुणी जात असते.
तिला पाहून अचानक शऱ्याला गझल म्हणावीशी वाटते..
तो म्हणतो,
शब्द तुझे, गाणे माझे…
गझल तुला ऐकवू का?
मुलगी उत्तर देते,
हात माझे, गाल तुझे
कानाखाली वाजवू का?
– हसमुख