इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
शहराचे नाव
शाळेत शिक्षिका इतिहास विषय शिकवित असतात.
त्याचवेळी शहरांच्या नामांतराची बाब चर्चेत येते.
शिक्षिका : मुलांनो, मला सांगा की, पूर्वी ज्या शहराचे नाव मद्रास होते.
ते आता कोणत्या नावाने ओळखले जाते?
विद्यार्थी : चेन्नई.
शिक्षिका : अगदी बरोबर उत्तर.
आता सांगा चेन्नई हे नाव का ठेवले?
विद्यार्थी : मॅडम, तिथले लोक लुंगी घालतात ना…
शिक्षिका : मग, त्याचा आणि शहराच्या नावाचा काय संबंध आहे
विद्यार्थी : आहे मॅडम. सांगतो. लुंगी ही पँटसारखी नसते.
तसेच तिला चैन नसते.
म्हणून चेन्नई (चैन नाही) असे नाव पडले.
(शिक्षिका बेशुद्ध…)
– हसमुख