इंडिया दर्पण – हास्य षटकार – चिन्याच्या आजीचा संताप
(चिन्या आणि त्याच्या आजीमझील संवाद)
कोरोना हा आजार
चीनमधून आलाय
असे चिन्याच्या
आजीला कळले.
आणि तिचा
प्रचंड संताप झाला.
आजी – मेल्यांच्या तोंडात
किडे पडो….
चिन्या – अगं आजी
असं नको
म्हणूस गं.
उलट त्यांची
फार मज्जा होईल.
आजी – कसं
काय रे
बाबा
चिन्या – अगं आजी,
त्यांचं मस्तपैकी
डिनर होईल ना
त्यामध्ये…
– हसमुख