इंडिया दर्पण – हास्य षटकार – चिंट्याचे मास्तरांना उत्तर
(मास्तर शाळेत शिकवित असतात तेव्हा)
मास्तर – पोरांनो, चला इकडे लक्ष द्या
सर्व विद्यार्थी (एकाच सुरात) – हो मास्तर
मास्तर – मला एका प्रश्नाचे उत्तर द्या
सर्व विद्यार्थी (एकाच सुरात) – विचारा मास्तर
मास्तर – हं. सांगा बरं, जेवण न करता
माणूस किती दिवस जगू शकेल
काही मुलं हात वर करतात.
मास्तर – चिंट्या तू सांग बरं
चिंट्या – खुप वर्ष जगू शकेल
मास्तर – कसं काय रे चिंट्या
चिंट्या – नाश्ता करुन
(मास्तरांना भोवळ आली आहे
आणि
त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी
सर्व विद्यार्थी प्रयत्न करीत आहेत)
– हसमुख