इंडिया दर्पण – हास्य षटकार – चिंगीचे सुंदररावांना उत्तर
(चिंगी घाईघाईने जात असते तेव्हा)
सुंदरराव – अगं चिंगी, एवढ्या घाईघाईने कुठे जातेय
चिंगी – गिरणीत जातेय
सुंदरराव – अगं, पण, पिशवीतून तर वाळू पडते आहे
चिंगी – हो, काल आमच्या मास्तरांनी शिकवले की,
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे.
म्हणूनच प्रयत्न करुन पाहतेय की,
तेल निघते का
– हसमुख