इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पत्नीचे बर्थडे गिफ्ट
पत्नीचा वाढदिवस असतो.
घरात अतिशय आनंदी वातावरण असते.
पतीने विचारले, तुला कोणती गिफ्ट हवे आहे?
(बायकोची इच्छा नवीन कार घ्यायची होती.)
ती हातवारे करत म्हणाली, मला अशी वस्तू द्या
ज्यावर मी स्वार होताच २ सेकंदात ० ते ८० पर्यंत पोहोचेल.
संध्याकाळी पतीने तिला
वजन काटा आणून दिला.
पत्नी अजूनही बेशुद्ध आहे.
– हसमुख