इंडिया दर्पण – हास्य षटकार – भुऱ्याचे मास्तरांना उत्तर
(कोरोनामुळे ऑनलाईन क्लास सुरू असतो)
झांबरे मास्तर – मुलांनो, इकडे लक्ष द्या रे
सर्व मुले माईक ऑन करुन
हो मास्तर असे म्हणत
कलकलाट करतात.
झांबरे मास्तर – अरे गप्प बसा रे. मी सांगतो
त्यानेच माईक ऑन करा
सर्व मुले पुन्हा हो असे म्हणत
पुन्हा गोंगाट करतात.
झांबरे मास्तर – ठीक आहे. भुऱ्या मला सांग बरं,
पहिल्या लाटेनंतर दुसरी लाटही आली.
आता जर तिसरी लाट आली तर
काय काळजी घेशील.
भुऱ्या – मास्तर, त्या काय काळजी
घेण्यासारखं आहे.
आम्ही समुद्र किनारी थोडेच राहतो
(हे उत्तर ऐकून मास्तर लाटांच्या समुद्रात गिरक्या घेताय)
– हसमुख