इंडिया दर्पण – हास्य षटकार – भटूरावांनी असं वाढवलं भूईमुगाच्या शेंगांचं उत्पन्न
(पारावर बसलेले भटूराव आणि छोटूराव गप्पा मारत असतात)
छोटूराव – रामराम भटूराव.
यंदा खुशीत दिसताय.
का काय झालं?
भटूराव – रामराम छोटूराव.
यंदा भुईमुगाच्या शेंगांचं
उत्पन्न चांगलं आलंय..
छोटूराव – किती आलं पीक?
भटूराव – गेल्या वर्षी पेक्षा यंदा
दीड क्विंटल शेंगा
जास्त आल्या.
छोटूराव – अरे व्वा..
असं काय केलं तुम्ही?
नवं बियाणं वापरलं का?
भटूराव – छे. नाही हो.
बियाणं तेच होतं.
छोटूराव – मग कसं काय?
भटूराव – काही नाही. शेंगा काढायला
ज्या बाया आल्या ना,
त्यांच्या तोंडाला मी
यंदा मास्क लावला.
बाकी काही नाही…
– हसमुख