इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
भिकारी आणि नोट
वाटेत एका भिकाऱ्याला ५०० रुपयांची नोट पडलेली दिसली.
तो विचारात पडला…
या नोटेचं काय करायचं…
काय करायचं….
कितीतरी वेळा विचार केला…
मग तो म्हणाला…
भूके पेट से भजन ना हो गोपाला…
त्यानंतर एका हॉटेलमध्ये जाऊन त्याने मनसोक्त जेवण केले.
बिल ११०० रुपये झाले.
मॅनेजरकडे गेला आणि गुपचूप म्हणाला…
माझ्याकडे पैसे नाहीत…
मॅनेजरने पोलिसांना बोलावले आणि
भिकाऱ्याला जेलमध्ये पाठवले…
भिकाऱ्याने ५००ची नोट दिली आणि बाहेर आला
मॅनेजरला भेटला आणि म्हणाला…
याला योग्य गुंतवणूक म्हणतात…
– हसमुख