इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
बंड्याच्या अभ्यासाची वेळ
(बंड्या आणि त्याचे वडिल बोलत असतात तेव्हा)
वडिल – बंड्या, अरे दिवसभर तू नुसता हुंदडत असतो, खेळतो.
मग, अभ्यास कधी करतोस?
बंड्या – बाबा, रात्री सगळे झोपी गेल्यावर
मी अभ्यास करतो
वडिल – पण, काल रात्री मी दोन वाजेपर्यंत
वाचत बसलो होतो.
आणि तू तर चक्क ढाराढूर झोपला होतास,
बंड्या – मी आधीच सांगितलं ना, की
सगळे झोपल्यावर मी अभ्यास करतो.
तुम्ही झोपण्याची मी वाट पाहत होतो.
– हसमुख