इंडिया दर्पण – हास्य षटकार – बंड्याचा निकाल लागतो तेव्हा
(निकाल घेऊन बंड्या शाळेतून घरी येतो)
बंड्या – बाबा, तुम्ही मला कबूल केले होते ना,
१०० मार्क मिळाले तर सायकल देईन!
वडील – हो बेटा, नक्की देईन!
बंड्या – चला द्या मग सायकल.
आज निकाल लागला आहे
आणि
मला १०० मार्क मिळाले आहेत!!!!!
आई – अरे व्वा, किती गुणाचा आहे गं माझ्या बंड्या.
एवढे मार्क कसे भेटले रे बंड्या???
बंड्या – अगं आई, हे बघ, मराठीत २२, गणितात १०,
विज्ञानात २०, इंग्रजीत १५, हिंदीत १५,
इतिहास भुगोल १८.
झाले की नाही शंभर!!!!
(हे ऐकून आई आणि वडिलांचे डोके गरगरायला लागले आहे)
– हसमुख