इंडिया दर्पण – हास्य षटकार – बंड्या, पप्पा आणि नेटवर्क
(एके दिवशी बंड्या आणि त्याचे पप्पा गप्पा मारत असतात)
बंड्या – पप्पा,
आपल्याकडे
फोर जी असूनही
नेटवर्कच मिळत नाही.
खरंच
खुप वैताग
आला आहे नेटवर्कचा.
पप्पा – अरे बंड्या,
आमच्यावेळी
थ्री जी, फोर जी
असं काहीच नव्हतं.
फक्त
गुरुजी आणि पिताजी
होते.
कधीही
नेटवर्कचा प्रॉब्लेम नसायचा.
बंड्या – ते कसं काय
पप्पा – गुरुजी आणि पिताजी यांनी
एक कानाखाली
वाजवली की
आमचं नेटवर्कच
फुल यायचं.
– हसमुख