इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
बंड्याचे थेट मास्तरांनाच आव्हान
(गावच्या शाळेत वर्ग सुरू असताना बंड्या थेट कापसे मास्तरांना थेट आव्हान देतो तेव्हा)
कापसे मास्तर – पोरांनो इकडे लक्ष द्या
सर्व विद्यार्थी गोंधळ घालत असतात
कापसे मास्तर – अरे पोरांनो, गप्प बसा.
मी काय सांगतो ते ऐका
सर्व विद्यार्थी – हो मास्तर.
कापसे मास्तर – पोरांनो, गाईचं दूध पिल्यानं बुद्धी वाढते.
दररोज गाईचं दूध प्यावं.
बंड्या – मास्तर काहीही काय सांगता,
असं असतं तर गाईचं वासरु
कित्ती कित्ती मोठं झालं असतं.
(हे ऐकून मास्तरांना का बोलावं तेच सूचेना)
– हसमुख