इंडिया दर्पण – हास्य षटकार – बदाम खाण्याचे फायदे
(दुकानात गिऱ्हाईक येते. त्यावेळी दुकानात नोकर असलेली मालू गिऱ्हाकाशी बोलत असते)
मालू – साहेब काय देऊ आपल्याला
गिऱ्हाईक – १ किलो साखर द्या
मालू – देते अजून काय देऊ
गिऱ्हाईक – काही नको. फक्त साखर द्या
मालू – अहो साहेब, बदाम नक्की घ्या. स्वस्त आहेत.
बदाम खाल्ल्याने डोकं चांगलं चालतं
गिऱ्हाईक – कसं काय. बदाम खाण्याचा आणि
डोकं चालण्याचा काय संबंध
मालू – हो आहे ना. सांगते. मला एक सांगा,
एक किलो तांदळात किती दाणे असतात
गिऱ्हाईक – नाही सांगता येणार. किती असतात
मालू – ते जाऊ द्या. हा बदाम खा आणि आता सांगा
एक डझन केळीमध्ये किती केळी असतात
गिऱ्हाईक – बारा
मालू – बघा, बदाम खाताच डोकं चाललं की नाही.
घेऊन टाका आता बदाम
(हे ऐकून गिऱ्हाईकाला चक्कर आली. तो अजूनही शुद्धीवर आलेला नाही)
– हसमुख