इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
रिक्षावाला आणि वाहतूक पोलिस
लाल सिग्नल असतानाही
एक रिक्षाचालक नियमाचे उल्लंघन करुन
रिक्षा वेगाने पुढे घेतो.
तेवढ्यात रस्त्याच्या कडेला असलेला वाहतूक पोलिस
शिटी मारतो आणि रिक्षा रस्त्याच्या कडेला घेण्याचे सूचवतो.
वाहतूक पोलिस – रिक्षा गॅसवर आहे का
रिक्षावाला – नाही
पोलिस – मग, डिझेलवर आहे का
रिक्षावाला – नाही
पोलिस – मग, पेट्रोलवर आहे का
रिक्षावाला – नाही
पोलिस – मग कशावर आहे
रिक्षावाला – हप्त्यावर आहे.
– हसमुख