इंडिया दर्पण – हास्य षटकार – गोट्या जेव्हा रागात जातो
गोट्या अतिशय खोडकर असतो.
त्यामुळेच त्याला घरी सातत्याने विविध कारणाने मारहाण होते.
एके दिवशी त्याला घरात मोठी मारहाण होते.
त्यानंतर तो शाळेत जात असतो.
रस्त्यात जाताना त्याला कुणीतरी विचारते, बेटा तू शाळेत जातोस का?
गोट्या म्हणतो, नाही, मी गणवेश घालून तुझ्या बापाच्या लग्नाला जातोय
– हसमुख