इंडिया दर्पण – हास्य षटकार – कंजूष आजोबा आणि दुकानदार
(अत्यंत कंजूष असलेले चिकणे आजोबा श्रवणयंत्राच्या दुकानात जातात)
चिकणे आजोबा – अरे बेटा, तुझ्याकडे श्रवणयंत्र आहे का
श्री. शहाणे (दुकानदार) – हो आजोबा, आहे ना
चिकणे आजोबा – अरे वा. मग, दाखव ना
श्री. शहाणे (दुकानदार) – तुम्हाला किती रुपयांपर्यंतचा हवा.
२०० रुपयांपासून २० हजारांपर्यंतचा आहे.
चिकणे आजोबा – इतका कसा रे फरक.
बरं, २०० रुपयांचा कसा आहे बघू
श्री. शहाणे (दुकानदार) – हे घ्या आजोबा. हे आहे २०० रुपयांचे
चिकणे आजोबा – अरे, यात तर काहीच नाहीय
श्री. शहाणे (दुकानदार) – अहो, असं कसं काही नाही
चिकणे आजोबा – ही तर फक्त वायर आहे.
यंत्र कुठं आहे
श्री. शहाणे (दुकानदार) – अहो आजोबा, यंत्राची काय गरज आहे.
फक्त हे एक बटण कानात घालायचे
आणि हा वायरचा तुकडा असा
लोंबकळत शर्टच्या खिशामध्ये टाकायचा. बसं. झालं
चिकणे आजोबा – अरे पण त्याने काय होईल
श्री. शहाणे (दुकानदार) – हो आजोबा. सगळ्यांना कळेल की
तुम्ही यंत्र घातलं आहे.
सगळे मोठ्याने बोलतील. सोप्प
– हसमुख