इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
१ कोटीची लॉटरी
एका सुंदर मुलीला १ कोटी रुपयांची लॉटरी लागते.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विचार केला
फोनवरून माहिती दिली तर
मुलीचा अत्यानंदाने मृत्यूही होऊ शकतो.
यामुळे कंपनीला दंड होऊ शकतो
यासाठी हे काम एखाद्या चमत्कारिक व्यक्तीकडे सोपवणे चांगले.
यानंतर कंपनीचे कर्मचारी एका वृद्धाला ते काम देतात.
ते वृद्ध बाबा त्या मुलीच्या घरी पोहचतात.
मोठ्या प्रेमाने बाबा मुलीला म्हणाले…
तुला १ कोटींची लॉटरी लागली तर तू काय करशील?
मुलगी आनंदाने म्हणते, मी तुमच्याशी लग्न करेन,
तुमच्यावर खुप प्रेम करेन
आणि लॉटरीची रक्कम अर्धी तुम्हाला देईन..
हे ऐकून म्हातारे बाबा एवढे आनंदी होतात की ते म्हणतात
थांब, वेडा बाई… आता माझा जीव घेशील का?
– हसमुख