इंडिया दर्पण – हास्य षटकार – आंबे
(जेव्हा सौ. पुणेकर आंबे खरेदीसाठी बाजारात जातात)
सौ. पुणेकर : मला
सगळे सडके,
खराब
आंबे द्या.
आंबेवाला : खराब???
सौ. पुणेकर : हो हो.
खराब, नासके
आणि
सडके!
आंबेवाला : (सर्व
खराब आंबे
एकत्र करून)
हे घ्या…
सौ. पुणेकर : हं.
ठेवा बाजूला…
आता
उरलेल्या पैकी
अर्धा डझन
आंबे द्या!
– हसमुख