मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावात NIA, ATS व IB या तीन सुरक्षा एजन्सीकडून संयुक्त कारवाई करण्यात आली. सहा तासांच्या कसून चौकशीनंतर एका संशयित डॉक्टरला ताब्यात घेतले आहे. मध्यरात्रीपासून चौकाशी सुरू होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
शहरातील अब्दुल्लानगर मधील एका होमिओपॅथी डॉक्टरच्या क्लिनिकवर तसेच त्याच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला. येथे मालेगाव नियंत्रण कक्ष येथे आणण्यात आले. दरम्यान, या संशयिताकडून काही साहित्य जप्त करण्यात आले का? नेमके चौकशीत काय निष्पन्न झाले? याबाबत तीनही पथकाकडून गोपनीयता पाळली जात आहे.