इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
ट्रेनमधील विक्रेता
(एक मुलगा ट्रेनमध्ये वर्तमानपत्र विकत असतो तेव्हा)
वाचा, आजची ताजा खबर.
बावीस जणांना हातोहात फसवले…
एक प्रवासी – मघाशी हा पोरगा तर
२१ जणांना फसवलं
असं ओरडत होता.
आता तो
२२ जणांना म्हणतोय…
दुसरा प्रवासी – २१वा मी होतो.
२२वे तुम्ही आहात.
तो जे ओरडतोय ना
तसली काहीच
बातमी नाहीय
या पेपरात
– हसमुख