विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना कालावधीत विविध सरकारी विभागांमध्ये भरती करण्यात येत आहे. स्पर्धा काळातही सरकारी नोकरी मिळू शकते. फक्त नोकरीची योग्य संधी शोधणे महत्त्वाचे आहे. सध्या शिक्षक भरती प्रक्रिया होणार असून ५८०० जागांसाठी युवकांना संधी मिळणार आहे.
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने शिक्षकांची ५८०० हून अधिक पदे निर्माण केली आहेत. या सेवा निवड मंडळाने शिक्षकांची भरती सुरू केली आहे. या रिक्त जागा इंग्रजी, बंगाली, उर्दू, संस्कृत, पंजाबी विषयांमध्ये टीजीटीसाठी आहेत. या भरतीमुळे शासकीय शाळांमधील ५८०० हून अधिक शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. या रिक्त पदांवर अर्ज करण्याची प्रक्रिया dsssbonline.nic.in मार्फत 4 जूनपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ जुलै आहे. त्यामुळे ही संधी चुकवू नका.