विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
शिक्षक किंवा प्राध्यापकाची नोकरीचे आकर्षण अनेक तरुणांना असते. अध्यापनाच्या क्षेत्रात नोकरी शोधत असालेल्या तरुणांसाठी दिल्लीतील जामिया, मिलिया, इस्लामिया विद्यापीठामध्ये नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे.
प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर या पदांच्या भरतीची अधिसूचना जेएमआयने जारी केली आहे. त्यानुसार एकूण ४७ पदांची नेमणूक करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत इच्छुक आणि पात्र उमेदवार ३० जून रोजी किंवा त्यापूर्वी या पदांसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना jmi.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की अंतिम तारखेनंतर कोणतीही सूचना स्वीकारली जाणार नाही. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० जून ही आहे.
असोसिएट प्रोफेसर पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मास्टर डिग्री आणि पीएच.डी. या व्यतिरिक्त संबंधित क्षेत्रात अनुभव असावा. तसेच शैक्षणिक पात्रता आणि इतर पदांशी संबंधित वयोमर्यादेसह इतर माहितीसाठी, अधिकृत वेबसाइटवर उमेदवार बघू शकतात.
या व्यतिरिक्त, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्स, दिल्लीने सहाय्यक प्राध्यापक पदावर भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. त्याअंतर्गत एकूण ३० पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू इच्छित सर्व उमेदवार ucms.ac.in वर यूसीएमएसच्या अधिकृत साइटवर अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ जून पर्यंत आहे.