शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या ठिकाणी नामांकित २४ कंपन्यांमध्ये ३६४८ पदांकरिता होणार भरती…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 16, 2024 | 7:15 pm
in स्थानिक बातम्या
0
job

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून येवला-लासलगाव परिसरातील तरुणांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्या वतीने रविवार १८ ऑगस्ट २०२४ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ४ या वेळत माऊली लॉन्स, विंचूर रोड, येवला येथे हा रोजगार मेळावा होणार आहे. या रोजगार मेळाव्याचे उदघाटन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घ्याव्यात असे मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून येवला मतदारसंघातील युवक युवतींसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून २४ नामांकित कंपन्यांमध्ये ३६४८ पदांकरिता भरती होणार आहे. यामध्ये १० वी पास ते पदवीधर, पदव्युत्तर, डिप्लोमा / डिग्री इंजिनिअरिंग, आयटीआय, फार्मसी, इ. सर्व प्रकारच्या शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या हजारो संधी उपलब्ध असणार आहे. कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षणाची संपूर्ण माहिती सोबत स्टार्टअप व उद्योजकतेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच ज्याना नोकरी न करता व्यवसाय करायचा आहे अशा उमेदवारांना स्वयंरोजगार मार्गदर्शन करण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या,महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या., मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या., महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.,अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ,संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे स्टॉल याठिकाणी असणार आहे. यातून स्वयंरोजगार मार्गदर्शन, विविध महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या मेळावा प्रसंगी सहभागी झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि मुलाखती पश्चात उमेदवार पात्र ठरल्यास त्यांना नियुक्तीपत्र देखील देण्यात येणार आहे.

या मेळाव्यात येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी सदर https://tinyurl.com/56n7jzxh लिंक वर किंवा क्यूआर कोडवर आपण नोंदणी करू शकता असे आवाहन अ. ला. तडवी, सहायक आयुक्त, कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता, नाशिक यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये पुन्हा तणाव निर्माण होताच पोलिसांकडून लाठीचार्ज…परिस्थिती नियंत्रणात

Next Post

सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील अखंड हरिनाम सप्ताहास मुख्यमंत्र्याची भेट…ही केली घोषणा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

anil ambani
इतर

अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे…बँक कर्ज फसवणूक प्रकरणाचा आरोप

ऑगस्ट 23, 2025
cbi
संमिश्र वार्ता

बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयने केली एकाला अटक…

ऑगस्ट 23, 2025
IMG 20250822 WA0435 1 e1755913257434
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये विशाल रक्तदान अभियान…६००० शिबिर, एक लाख युनिट रक्त संकलित करण्याचा संकल्प

ऑगस्ट 23, 2025
Radhakrishna vikhe patil
संमिश्र वार्ता

मराठा समाज विकासासाठी पुनर्गठित मंत्रीमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील

ऑगस्ट 23, 2025
NMC Nashik 1
स्थानिक बातम्या

नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर…३१ प्रभाग १२२ नगरसेवक, हरकती मागवल्या

ऑगस्ट 23, 2025
वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात जनता दरबार संपन्न 1
संमिश्र वार्ता

ठाण्यात मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार, २०० हून अधिक निवेदने प्राप्त…राजकीय चर्चाही रंगली

ऑगस्ट 23, 2025
GST 3
महत्त्वाच्या बातम्या

करचुकवेगिरी प्रकरणात ३० कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक…दोन जणांना अटक

ऑगस्ट 23, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींची कौटुंबिक कलहातून सुटका होईल, जाणून घ्या,शनिवार, २३ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 23, 2025
Next Post
Screenshot 20240816 194754 Facebook

सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील अखंड हरिनाम सप्ताहास मुख्यमंत्र्याची भेट…ही केली घोषणा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011