नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगातील प्रत्येक धर्मात परमेश्वर किंवा प्रेषित याची संकल्पना आहे. त्यानुसार त्या त्या धर्माचे नागरिक त्या त्या परमेश्वराची पूजा किंवा उपासना करत असतात. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीत हिंदू धर्मात अनेक देव देवता असून त्यांचीही धर्मातील नागरिक पूजा आणि उपासना करतात. मात्र हिंदू देवतांबद्दल कायमच वादग्रस्त वक्तव्य काही जण करत असतात.
आता देखील अशीच घटना घडली असून जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरूंनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
हिंदू देव-देवता उच्च जातीचे नाहीत. भगवान शंकरदेखील अनुसूचित जाती-जमाती म्हणजेच शूद्र असू शकतात. मानवजातीच्या विज्ञानानुसार देव उच्च जातीचे नाहीत, असे वक्तव्य जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी यांनी केले आहे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयू तिथे होणाऱ्या आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र सध्या एक वेगळ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. कुलगुरू यांनी केलेल्या एका विधानामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. शांतीश्री धुलीपुडी यांनी हिंदू देव-देवतांबाबत आपले विचार मांडले, असं त्या म्हणाल्या आहेत. देशात सध्या सुरु असलेल्या धार्मिक तेढ आणि हिंसाचाराबाबत त्यांनी आपलं मत मांडलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत आंबेडकरांचे लैंगिक न्यायाबद्दलचे विचार: समान नागरी संहिता डीकोडिंग या विषयावर व्याख्यान देताना कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी यांनी हे विधान केलं. शिवाय मनुस्मृतीत महिलांना शूद्रांचा दर्जा देण्यात आला आहे. महिलांना त्यांच्या वडिलांकडून किंवा पतीकडून जात मिळते. हे प्रतिगामी असण्याचं लक्षण आहे”, असेही त्या म्हणाल्या आहेत.
अनेकांना मानवजातीच्या विज्ञानानुसार आपल्या देवांची उत्पत्ती माहित असावी. कोणताही देव ब्राह्मण नसतो, सर्वोच्च क्षत्रिय असतो. भगवान शंकर स्मशानभूमीत बसल्यामुळे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे असावेत. शंकराच्या गळ्यात साप असतो. अंगावर कपडेही कमी कपडे असतात, असंही शांतीश्री धुलीपुडी म्हणाल्या आहेत. मानवजातीच्या शास्त्रानुसार माता लक्ष्मी, शक्ती अगदी भगवान जगन्नाथही उच्च जातीतून आलेले नाहीत. भगवान जगन्नाथ हे खरे तर आदिवासी वंशाचे आहेत. मग आजही आपण हा भेदभाव का सुरू ठेवतोय जो अत्यंत अमानवी आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा आपण पुनर्विचार करत आहोत हे फार महत्वाचे आहेत. हिंदू धर्म हा धर्म नाही, ती जीवनपद्धती आहे, असंही त्या म्हणाल्या.
शांतीश्री धुलीपुडी या सध्या जेएनयूच्या कुलगुरु म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्या प्राध्यापिका होत्या. शांतीश्री धुलीपुडी पंडित या पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या राजकारण आणि लोकप्रशासन विभागात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्याकडे अध्यापनाचा मोठा अनुभव आहे. तसंच त्या जेएनयूच्या माजी विद्यार्थिनीदेखील आहेत. जेएनयूच्या कुलगुरूपदी पहिल्यांदाच एका महिलेला स्थान मिळाला आहे.
प्राध्यापक शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज, मद्रास आणि कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतले. तसेच त्यांनी जेएनयूमधून आंतरराष्ट्रीय संबंधात एमफिल आणि भारतीय संसद आणि परराष्ट्र धोरण या विषयावर पीएचडी केली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमधून त्यांनी सोशल वर्कमध्ये डिप्लोमाही केला आहे. तसेच मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून इतिहास आणि सामाजिक मानसशास्त्र आणि एम.ए. राज्यशास्त्रात बी.ए.पूर्ण केले आहे. जेएनयूच्या कुलगुरूपदी नियुक्त झालेल्या पंडित या पहिल्या महिला कुलगुरू आहेत. कुलगुरू म्हणून त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे. जेएनयूच्या हे एक नवी दिल्लीमधील विद्यापीठ आहे. त्याची स्थापना १९६९ मध्ये झाली. विद्यापीठाची स्थापना संसदेच्या अधिनियमाने केली. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावे हे विद्यापीठ आहे.
JNU Vice Chancellor Pandit Controversial Statement on Hindu Gods
Shantishree Dhulipudi