इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकशाहीत विरोधकांना व्यक्त होता आलेच पाहिजे. ते त्यांचा अधिकारच आहे. मात्र सध्याच सरकार हे गुन्हेगारांना संरक्षण आणि सरकार विरोधात बेड्या घालत आपली राजकीय कातडी गेंड्याची असल्याची जाणीव करून देत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, हजारो भारतीयांना अमेरिका हातात आणि पायात बेड्या घालून मिलिटरी विमानांनी भारतात वापस पाठवत आहे. ही देखील अत्यंत चुकीची गोष्ट आपल्या देशवासीयांच्या सोबत घडत असताना केंद्र सरकार मात्र हाताची घडी घालून चुप्प बसले आहे.
भारतात रवानगी करण्यात आलेले नागरिक हे जरी डिपोर्ट केलेलें असले तरी त्यांची डीग्निटी एक भारतीय म्हणून जपणे, हे या केंद्र सरकारच काम आहे.
या सरकारला या प्रतीकात्मक विरोधातून इतकच सांगायच आहे की, अमेरिका हा काही आपला बाप नाही..त्यांना घाबरायच काही एक कारण नाही..! आज विधानभवनात बेड्या घालून येण्यामागे हीच प्रामाणिक भावना आहे.