मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र सरकारचे जावई असलेल्या अशोका बिल्डकॉनला सुमारे 5000 कोटींच्या वरचे MMRDA, MSRDC, CIDCO आणि BMC यांचे टेंडर मिळाल्यानंतर,अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचे समजत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत त्यांनी म्हटले आहे की, अशोका बिल्डकॉनसाठी टेंडरचे वर्क ऑर्डर काढण्यासाठी ‘सेटिंग लावून’ अचार संहितेचे उल्लंघन केले जात असून, मागील तारीख दाखवून वर्क ऑर्डर काढण्याचे कारस्थान चालू असल्याचे समजते. अनेक तक्रारी असूनदेखील, संबंधित अधिकारी डोळेझाक करत आहेत.
याअगोदरही जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा हा आरोप केला आहे. या आरोपाबाबत अशोल बिल्डकॅानकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.