इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोण काय बोलेल व काय तर्क देईल हे सांगता येत नाही. आता भाजपचे खासदार अनुराग ठाकुर यांनी विद्यार्थ्यांना अंतरिक्षात जाणारा पहिला व्यक्ती कोण? असा प्रश्न विचारुन हनुमानजी होते असे सांगितले. त्यामुळे त्यावर आता वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती प्रतिक्रिया येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुध्दा एक व्हिडिओ पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की,
अनुराग ठाकूर अंतरिक्षात जाणारा पहिला व्यक्ती कोण? असा प्रश्न विचारतात. मुलं नील आर्मस्ट्राँग हे उत्तर देतात. पण, अनुराग ठाकूर म्हणतात मला तर वाटतं हनुमानजी होते. आणि मग ते भाषण करतात आपण हजारो वर्षं आपली परंपरा, संस्कृती जाणली नाही तर आपण तेच मान्य करतो जे इंग्रजांनी सांगितलं.
त्यावर आव्हाड यांनी म्हटले आहे की, पण वास्तव काय? याच अनुराग ठाकूर यांचा मुलगा परदेशात शिक्षण घेतो आहे. उद्या तो इंजिनिअर, शास्त्रज्ञ किंवा थेट BCCI चा अध्यक्ष होईल. आणि इथे आपल्या देशातील लहान मुलांना चुकीची माहिती देऊन, गुमराह करून स्वतःच्या राजकारणासाठी वापरलं जातं.
हीच आहे BJP स्टाईल “संस्कृती” आणि “शिक्षण”!