नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- काँग्रेसने नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थितीत करत थेट पुरावे सादर केले. निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून निवडणूक कशी चोरली? असे सांगत त्यांनी त्याबाबतचे पुरावे दिले. डुप्लिकेट मतदार
बनावट आणि अवैध पत्ते, एकाच पत्त्यावर मोठ्या प्रमाणात मतदार, अवैध फोटो, फॉर्म ६ चा गैरवापर याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थितीत केले.
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी एक पोस्ट केली असून ती सध्या चर्चेत आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीत, आपली साडेतीन लाख मते कापली गेली होती, अशी व्यथा व्यक्त करून दाखविली. पण, त्याहून आणखी एक सत्य असे आहे की, नितीन गडकरी यांना तिकिट देण्यातच अडचण निर्माण करण्यात आली होती.
माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अतिशय आग्रही भूमिका घेतल्यानेच गडकरी यांना उमेदवारी मिळाली. गडकरी यांना पाडायचा, असा जवळ जवळ निर्णयच झाला होता. याकडे पाहता, जे काँग्रेस किंवा इतर पक्षांच्या उमेदवारांच्या बाबतीत केले गेले आहे, तेच नितीन गडकरी यांच्याबाबतही केले गेले आहे. नितीन गडकरींचे मी नेहमीच कौतूक करीत आलोय की, ते सत्य बोलायला कधीच मागेपुढे पहात नाहीत अन् घाबरतही नाहीत. ये अंदर की बात है, नितीन गडकरी ‘सत्य’ के साथ है! असे म्हटले आहे.