इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी मंत्री कोकाटे यांच्या एका वक्तव्यावरुन त्यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट केली असून त्यात म्हटले आहे की, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना सत्तेचा माज चढलाय.
आव्हाड यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना, सत्तेचा माज चढलाय, हे त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून दिसून येत आहे.
ते म्हणाले, आजकाल भिकारी देखील १ रुपया घेत नाही, परंतु आम्ही शेतकऱ्यांना १ रुपयात विमा देतोय..! देशाच्या पोशिंद्याला भिकारीची उपमा देणाऱ्या माणिकराव कोकाटे यांनी तमाम शेतकरी बांधवांची तत्काळ माफी मागावी..!
नेमकं काय बोलले मंत्री कोकाटे
भिकारी सुध्दा एक रुपया घेत नाही, पण, शेतक-यांना फक्त एक रुपयांमध्ये पीक विमा देण्यात आला. पीक विमा योजनेतील गैरवापर आणि संबधीत गैरव्यवहारांबद्दल बोलतांना त्यांनी कारवाई करण्याबद्दल बोलत असतांना हे वक्तव्य केले. त्यानंतर त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांवरुन जोरदार टीका सुरु झाली.