इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
डॅा.नामदेव शास्त्री महाराज यांनी आज धंनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे समर्थन करणे अंत्यत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट टाकत म्हटले आहे की, भगवान गडासारख्या पवित्र ठिकाणावरुण अशा गुन्हेगारी व्रताचे समर्थन आणि पाठराखण होणे, ही समाजासाठी आत्यंत घातक गोष्ट आहे.
आव्हाड यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कधीकाळी आपण भगवानगड राजकारण्यापासून मुक्त करण्याची शपथ घेतली होती? आणि आज निष्पाप लोकांचे बळी घोणा-या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करुण त्याचे आयुष्य उदध्वस्त करणाऱ्या धंनजय मुंडे वाल्मिक कराड टोळीचे समर्थन करताय ही मनाला न पटणारी गोष्ट आहे. शास्त्री महाराज आपल्या बद्दल आम्हाला नितांत आदर आहे, पण आपण धनंजय मुडे वाल्मीक कराड टोळीची पाठराखण करणे हे भगवान बाबांच्या विचारांना तिलांजली देण्यासारखे आहे.
धंनंजय मुंडे वाल्मीक कराड यांच्या गुन्हेगारी आणि राक्षसी राजकीय महत्वकांक्षे साठी उध्वस्त केलेल्या समाजातील लोकांची यादी देतोय, त्या सर्वांना आणि धंनजय मुंडे वाल्मीक कराड यांना भगवान गडावर समाजाची परीषद बोलावून समोरासमोर बसुन चर्चा घडवून आणा, म्हणजे धंनजय मुडे वाल्मिक कराड हे किती मोठे संत आहेत हे संपुर्ण जगाला कळेल.
ज्यांचे खुण झालेत आसे….
१) मयत संगीत डिघोळे परळी यांचे कुटुंब
२) मयत काकासाहेब गर्जे परळी यांचे कुटुंब
३) मयत महादेव मुंडे परळी यांचे कुटुंब
४) मयत बापु आंधळे परळी यांचे कुटुंब
५)मयत बंडु मुंडे परळी यांचे कुटुंब
ज्यांच्यावर जिवघेणे हल्ले घडवुण आणले आहेत आसे..
१) महादेव गित्ते परळी
२) सहदेव सातभाई परळी
३) राजाभाऊ नेहरकर परळी
ज्यानां खोट्या गुन्ह्यांत आडकवुन त्यांचे आयुष्य उध्वस्त केले आसे…..
१) प्रा. शिवराज बांगर बीड
२) बबनभाऊ गित्ते परळी
३) रामक्रष्ण बांगर, विजयसिंह बांगर पाटोदा
४) करूणा धंनजय मुंडे परळी
५) प्रकाश मुंडे नाथ्रा परळी
६) राजाभाऊ फड परळी
आशी खुप मोठी समाजातील लोकांची यादी आहे, (इतर समाजाची यादी जोडल्या ती फार मोठी होईल) ज्यांना घेऊन मी आपल्याकडे येतो, यांच्या वेदना आणि त्यांना वेदना देणारा कोण आहे? हे आपण महंत म्हणुन विचारणार का?
धंनंजय मुंडेच्या हाताला लावलेल्या सलाईन पेक्षा धंनजय मुंडे वाल्मीक कराड यांच्यामुळे अनाथ झालेली लेकरे, विधवा झालेल्या बायका, आपल्या पोटच्या मुलांन गमावून सतत डोळ्यातुन आसवे गाळणारे आई बाप, यांनी घडवून आणलेल्या हल्ल्याने कायम आधु झालेले लोक, यांनी खोट्या गुन्ह्यांत आडकवल्या नंतर तुरुंगात खितपत पडलेले किंवा रानोमाळ भटकंती करणारे लोक यांचे दुःख फार मोठे आहे. महंत म्हणुन आपण हे दुःख समजावुण घेणार आहात का?
सुदर्शन घुले, प्रतीक घुले, गोट्या गित्ते , धनराज फड, सुनिल फड, विष्णु चाटे, रघु फड, यांसारखे समाजातील शेकडो तरुण स्वताः च्या राजकीय फायद्यासाठी गुन्हेगार बनवलेत. त्यांच्या कुटुंबाची काय आवस्था आहे? असा प्रश्नही त्यांनी केला.