इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड सोडत नाही. ते फुटीर गटावर सुरुवातीपासून जोरदार टीका करतात. आता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला गर्दी गोळा करण्यासाठी पैसे वाटप केल्याचा आरोप करुन सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पैसे देऊन वोट घेणे; पैसे देऊन लोकं जमा करणे, ही या सत्ताधाऱ्यांची आता सवय झाली आहे. एकंदरीतच या कारभारामुळे लोकं इतकी वैतागलेली आहेत की ते कशालाच साथ देत नाहीत. आता बघा ना, पांढरे कपडे सोडून गुलाबी झालेले अजितदादा यांच्या सभेलासुद्धा लोक येत नाहीत. मग, लोकांना आणण्यासाठी भ्रष्टाचारातून आलेला पैसा वापरलाच पाहिजे. म्हणूनच सभेमध्ये खुलेआम पैसे वाटताना लोकं दिसत आहेत. आता तरी ओळखा, जनतेला तुम्ही केलेली गद्दारी आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणाचा तिटकारा आलाय. म्हणूनच पैसे देऊनसुद्धा लोकं जमत नाहीत.