इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पारतंत्र्यातून, गुलामगिरीतून मुक्त झाल्याची भावना देशवासियांच्या व लोकप्रतिनिधींच्या मनात निर्माण व्हावी म्हणून ‘नवे संसद भवन’ उभारले असे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्याचबरोबर प्रभु रामाचं मंदिर पूर्ण झाले, त्याचवेळी देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. या दोन्ही विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
ते म्हणाले की, नवे संसद भवन बांधले ते ही गळकेच! राम मंदीर उभारले ते सुध्दा गळकेच !! ज्यांनी आयुष्याची होळी केली. भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, हसत हसत फासावर गेले. महात्मा गांधींनी पहिल्या अतिरेक्याकडून हसत हसत मरण पत्करलं, तो “संघर्ष”, ती स्वातंत्र्याची लढाई; आम्हा भारतीयांना गौरवास्पद वाटते. आम्हाला गळके, स्वातंत्र्य कदापी मान्य नाही.