मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) महायुती सरकारवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बोचरी टीका केली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले आहे की, गजापूर, विशाळगडमध्ये एवढे मोठे प्रकरण घडले… आरोपी फरार ! बदलापूरच्या शाळेत चिमुरड्यांचे लैंगिक शोषण झाले… आरोपी संस्थाचालक फरार ! छत्रपती शिवाजी महाराजांचा निकृष्ट पुतळा बनवला… आरोपी शिल्पकार फरार !
तुम्ही बलात्कार करा; तुम्ही दंगली घडवा. पण, तुम्ही जर आमची माणसे असाल तर बिनधास्त रहा; तुम्हाला फरार करून टाकू!! सरकारची नवीन “फरार व्हा योजना” !