मुंबई – रिलायन्स जिओ आणि गुगल यांनी विकसित केलेला जिओफोन नेक्स्ट लॉन्च केला आहे. त्यामुळे सहाजिकच त्याच्या बुकींगकडे अनेकांचा ओढा आहे. पण, एअरटेल स्मार्टफोनचाही उत्तम पर्याय ग्राहकांपुढे आहे. जिओ फोन नेक्स्ट की एअरटेल स्मार्टफोन हे आपण आता जाणून घेणार आहोत….
बाजारात आता परवडणार्या दरात स्मार्टफोन उपलब्ध झाले आहेत. जिओफोन नेक्स्टने बाजारात उडी मारल्यानंतर भारती एअरटेल कंपनीनेही स्वस्त दरात स्मार्टफोन उपलब्ध करू दिले आहेत. काही दिवसांपूर्वी भारती एअरटेल कंपनीतर्फे स्मार्टफोन खरेदीवर ऑफर देण्यात आली होती. जिओफोन नेक्स्ट बाजारात उतरल्यानंतर स्मार्टफोन चांगला ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. जिओफोन नेक्स्ट पाहून टेल्कोच्या या् स्मार्टफोन ऑफरलाही कमी लेखण्यात आले होते. रिलायन्स जिओतर्फे जिओफोन नेक्स्टची किंमत ६,४९९ रुपये असल्याचे जाहीर केल्यानंतर एअरटेलच्या स्मार्टफोनची ऑफर इतकीही वाईट नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
नवी ओपरेटिंग सिस्टिम आणि वेगळे फिचर्स ही जिओफोन नेक्स्टची बलस्थाने आहेत. ऑपरेटिंग सिस्टिमवर डिव्हाइसची ओळख ठरते. प्राथमिक स्तरावरील युजर्सचा स्मार्टफोनचा वापर करण्याचा अनुभव अपग्रेड करण्यासाठी हायली ऑप्टिमाइझ अँड्रॉइड ओएस असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. जिओफोन नेक्स्ट ईएमआयवर खरेदी केला तर त्याची किंमत जास्त होते. परंतु डाटा आणि कॉलिंग बेनिफिट्ससह हा फोन मिळत असल्याने डाटा आणि कॉलिंगचा ताण नाही. जिओफोन नेक्सटमध्ये फक्त जिओच्या सिमचा वापर केला जाऊ शकतो.
कॅशबॅक
भारती एअरटेल युजर्सना सहा हजार रुपयांचा कॅशबॅक मिळविण्यासाठी रिचार्ज प्लॅन्सवर खूपच खर्च करावा लागणार आहे. तरीही दीर्घकाळ वापर करणार्या ग्राहकांना या स्मार्टफोनची किंमत कमीच ठरेल. भारती एअरटेलकडून अनेक ब्रँड्सच्या शेकडो स्मार्टफोनच्या खरेदीवर कॅशबॅकची सुविधा देण्यात येत आहे. यामुळे जो ब्रँड खरेदी करायचा आहे त्याच्या खर्च करण्यावर ग्राहकांचे नियंत्रण राहू शकेल.