पुणे – सध्याच्या काळात मोबाईल ही अत्यंत महत्त्वाची नव्हे तर अत्यावश्यक गरज बनली आहे, असे म्हटले जाते. सहाजिकच मोबाईल वापरताना त्यामध्ये रिचार्ज किंवा टॉकटाईम टाकताना वेगवेगळ्या प्लॅन किंवा योजनांचा विचार करावा लागतो. अलीकडच्या काळात बहुतांश टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्लॅन्सच्या दरांमध्ये वाढ केल्याने मोबाईल धारक ग्राहकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे, तरीही त्यातील स्वस्त प्लॅन कोणते ? हे माहीत करून घेणे आवश्यक आहे. देशातील टॉप टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे प्रीपेड प्लान महाग केले आहेत. एअरटेल आणि व्होडाफोन – आयडिया प्रीपेड प्लॅनच्या नवीन किमती गेल्या आठवड्यापासून लागू झाल्या आहेत.
उद्या दि. 1 डिसेंबरपासून जिओचे प्रीपेड प्लॅन महाग होणार आहेत. आता आपल्याला कमी किमतीत सर्वोत्तम आणि मूल्याची योजना निवडण्यात काही अडचण येऊ शकते. मात्र जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन – आयडिया ( Airtel, Jio आणि Vodafone-Idea ) च्या 400 रुपयांच्या अंतर्गत काही सर्वोत्तम प्लॅन्सबद्दल तसेच डेटा आणि फ्री कॉलिंग तसेच अनेक अतिरिक्त फायदे मिळतील, याचा तपशील जाणून घेऊ या…
एअरटेलचे काही स्वस्त प्लॅन असे
179 – या प्लॅनमध्ये कंपनी देशभरातील सर्व नेटवर्कवर 2GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग ऑफर करत आहे. तसेच 28 दिवसांच्या वैधतेसह देण्यात येणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Amazon Prime Video च्या मोबाइल एडीशनची मोफत चाचणी देखील मिळेल.
265 – 28 दिवसांच्या वैधतेसह देण्यात येणाऱ्या या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध आहे. दररोज 100 मोफत एसएमएस ऑफर करणार्या या प्लॅनमध्ये, तुम्हाला Amazon Prime Video च्या मोबाइल एडीशनची 30 रुपयांची मोफत चाचणी देखील मिळेल.
299 – या प्लॅनची वैधता देखील 28 दिवसांची आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 मोफत एसएमएस दिले जात आहेत. अमर्यादित कॉलिंग लाभांसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये कंपनी Amazon Prime Video च्या मोबाइल एडिशनची मोफत चाचणी देखील देत आहे.
359 – या प्लॅनमध्ये कंपनी 28 दिवसांची वैधता आणि दररोज 2GB डेटा देत आहे. प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित मोफत कॉलिंग सुविधा देखील मिळेल. हा प्लॅन Amazon Prime Video च्या मोबाईल एडिशनमध्ये मोफत प्रवेश देखील देतो.
व्होडाफोनचे सर्वोत्कृष्ट प्लॅन असे
179 – या प्लॅनमध्ये Voda फोन आपल्या यूजर्सना 28 दिवसांची वैधता आणि 2 GB डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध असेल.
269 – दररोज 1GB डेटा ऑफर करणारा, हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये, दररोज 100 मोफत एसएमएससह अमर्यादित कॉलिंगचा लाभही मिळेल. या प्लॅनमध्ये कंपनी Vi Movies आणि TV चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे.
299 – या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5 GB डेटा मिळेल. 28 दिवसांच्या वैधतेसह येणारा, हा प्लॅन देशभरातील सर्व नेटवर्कवर दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 विनामूल्य एसएमएस देखील ऑफर करतो. या प्लॅनमध्ये समाविष्ट असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Binge All Night आणि Vi Movies & TV अॅपची मोफत सदस्यता समाविष्ट आहे.
359 – या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2 जीबी डेटा देत आहे. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचे फायदेही दिले जात आहेत. ही योजना वापरकर्त्यांना Binge All Night सोबत Vi Movies & TV अॅपची मोफत सदस्यता देखील देते.
जिओचे सर्वोत्कृष्ट प्लॅन असे
129 – दि. 1 डिसेंबरपासून 155 रुपयांचा असेल. या प्लॅनमध्ये 2 GB डेटा, अमर्यादित कॉलिंगसह 300 मोफत एसएमएस मिळतील. त्याच वेळी, Jio च्या 179 रुपयांच्या प्लॅनमध्ये 24 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1 GB डेटा आणि मोफत कॉलिंग फायदे मिळतात. कंपनीच्या या प्लानची किंमत आधी 149 रुपये होती.
239 – या प्लॅनमध्ये, 28 दिवसांच्या वैधतेसह, दररोज 1.5 GB डेटा ऑफर केला जाणार आहे. या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध असेल, जे दररोज 100 मोफत एसएमएस देतात. कंपनीच्या साइटवर या प्लॅनची किंमत सध्या 199 रुपये आहे आणि 1 डिसेंबरपासून त्याची किंमत 239 रुपये असेल.
299 – सदर कंपनीच्या या प्लॅनची किंमत 299 रुपये असणार आहे. प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचा लाभ मिळेल.