इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दूरसंचार क्षेत्रातील नावाजलेली कंपनी जिओकडे स्वतःचे इन – हाऊस अॅप्स आहेत, ज्यामध्ये Jio Cinema, JioTV, JioSaavn, OTT प्लॅटफॉर्मचा आणि बऱ्याच अॅप्सचा समावेश आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना कोणतेही इतर अॅप्लिकेशन इन्स्टॉल करण्याची गरज राहत नाही. त्याचप्रमाणे आता क्रिकेट, दैनंदिन मालिका, बातम्या आणि बरेच काही लाइव्ह टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी JioTV हा पर्याय उपलब्ध झाला असून Android, iOS आणि Jio फोनवर जिओ टीव्हीचा लाभ घेता येणार आहे.
जिओ ग्राहकांसाठी सर्व अॅप्लिकेशन्स मोफत वापरता येतात. आता, कंपनीने Jio Watch Party फीचरची घोषणा केली आहे. JioTV वॉच पार्टी देशभरातील सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल परंतु ती फक्त क्रिकेट सामन्यासाठी वॉच पार्टी पाहण्यासाठी लागू आहे. यामुळे आपल्या मित्रांसोबत, कुटूंबियांसोबत एकाचवेळी आपल्याला मॅच बघता येऊ शकते.
एकदा तुम्ही सामना पाहण्यास सुरुवात केली की, तुम्हाला खालच्या स्क्रीनवर “वॉच पार्टी” नावाचा पर्याय दिसेल. वॉच पार्टी सुरू करण्यासाठी फक्त आयकॉनवर टॅप करायचा आहे. संबंधित लिंक वापरून मित्रांनी / कुटुंबाने तयार केलेल्या वॉच पार्टीत सामील होता येणार आहे. ज्यांना हे वैशिष्ट्य मिळवायचे असेल त्यांनी Android आणि iOS वरचे अॅप अपडेट करुन या वैशिष्ट्यांचा लाभ घ्यावा. सध्या हे वैशिष्ट्य फक्त थेट क्रिकेट सामन्यासाठी असले तरी भविष्यात अधिक सामग्रीसाठी जिओ वॉच पार्टी आणण्याची शक्यता आहे.
JIo TV Cricket Match New Feature Live Events Mobile Telecom Technology