पुणे – देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना नेहमीच नवनवीन उत्तम योजना देत असते. या कंपनीने अलीकडेच 5 नवीन प्रीपेड प्लॅन आणले आहेत. सदर प्लॅन कोणत्याही डेटा मर्यादेशिवाय आहेत. यापैकी एक प्लान 447 रुपयांचा असून दोन महिन्यांच्या वैधतेसह देण्यात येतो. याशिवाय, कंपनी आधीच 444 रुपयांचा दुसरा प्लॅन ऑफर करत आहे. या योजनांच्या किमतीत फारसा फरक नाही, फक्त 3 रुपयांचा फरक आहे. जवळजवळ समान किंमतीमुळे, ग्राहक त्यांच्यासाठी कोणता प्लॅन चांगला असेल याबद्दल गोंधळ होऊ शकतो म्हणूनच या दोन योजनांची माहिती करून घेऊ या…
444 रुपयांचा प्लॅन
सर्वप्रथम, जिओच्या आधीच्या असलेल्या योजनेबद्दल माहिती घेऊ या, जिओच्या 444 रुपयांच्या योजनेसह, ग्राहकांना 56 दिवसांची वैधता आणि दररोज 2 जीबी डेटा मिळतो. अशा प्रकारे एकूण डेटा 112GB मिळतो. प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात. याशिवाय ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी या सारख्या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.
447 रुपयांचा प्लॅन
त्याचबरोबर जिओच्या 447 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 50GB डेटा 60 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. हा डेटा कोणत्याही दैनंदिन मर्यादेशिवाय आहे. प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात. याशिवाय ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी सारख्या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.
दोन्ही योजना जवळजवळ समान किंमत आणि वैधतेच्या आहेत. मात्र 444 रुपयांच्या तुलनेत 447 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 3 रुपये अतिरिक्त देऊन 4 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळते. 447 रुपयांच्या प्लॅनमध्ये अर्धा डेटा उपलब्ध असला तरी, तुमच्या गरजेनुसार खर्च करू शकाल. म्हणजेच, आपण सर्व डेटा एका दिवसात पूर्ण करू शकता, किंवा काही दिवस कमी आणि काही दिवस अधिक वापरू शकता.