पुणे – रिलायन्स जिओ कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आणि ऑफर आणत असते. आता सणासुदीच्या वेळी कंपनीने ग्राहकांना पूर्वीपेक्षा एक नवीन आणि अधिक आकर्षक ऑफर दिली आहे. जिओने आपल्या ग्राहकांसाठी काही प्रीपेड रिचार्जवर 20 टक्के कॅशबॅक सादर केला आहे.
मोबाईल वापरकर्ते MyJio अॅप किंवा जिओ कंपनीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे रिचार्ज करतील, तेव्हा ही कॅशबॅक ऑफर लागू होईल, यात ग्राहकांना 249, 555 आणि 599 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनवर कॅशबॅक दिला जातो. हा कॅशबॅक वापरकर्त्याच्या खात्यात जमा केला जाईल आणि भविष्यातील रिचार्जसाठी वापरला जाऊ शकतो.
सदर ऑफर सणासुदीच्या आधीच देण्यात येत आहे. तसेच या तीन JIO प्रीपेड प्लानमध्ये 84 दिवसांपर्यंत वैधता देण्यात येतात. जिओने आपल्या प्रीपेड रिचार्ज मायक्रोसाइटसाठी नवीन 20 टक्के कॅशबॅक विभाग सादर करण्यासाठी आपली वेबसाइट अपडेट केली आहे.
249 प्रीपेड रिचार्ज 28 दिवसांची वैधता, 2GB प्रतिदिन डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 SMS सह देण्यात येतो. डेटा मर्यादा संपल्यानंतर, Jio स्पीड 64Kbps पर्यंत मर्यादित करेल.
जिओचे 555 रुपयांचे प्रीपेड रिचार्ज 84 दिवसांची वैधता असून दररोज 1.5 जीबी डेटा तसेच अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएससह देण्यात येतो.
जिओचे 599 रुपयांचे प्रीपेड रिचार्ज मध्ये अनेक फायदे असून 84 दिवसांची वैधता देण्यात येते, परंतु दररोज फक्त 2GB डेटा मिळतो. तिन्ही योजना JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सबस्क्रिप्शन सारख्या अतिरिक्त फायद्यांसह येतात.
या कॅशबॅकचा लाभ घेण्यासाठी, जिओ ग्राहकांना MyJio अॅप आणि Jio.com साइटला भेट देणे आवश्यक आहे. कंपनीने अलीकडेच एक वर्षाच्या डिस्ने प्लस हॉटस्टार्ट मोबाईल सबस्क्रिप्शनसह नवीन प्रीपेड प्लॅन सादर केले असून हे रिचार्ज 499 रुपयांपासून सुरू होतात.
यात ग्राहकांना 28 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससह दररोज 3 जीबी हाय-स्पीड डेटा प्रवेश देते. या मालिकेतील सर्वात प्रीमियम प्लॅन 2,599 रुपयांचा असून यात दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा ग्राहकांना ऑफर करतो, तसेच 365 दिवसांच्या वैधतेसाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस लाभांसह मिळतो.