मुंबई – गेल्या दहा वर्षात मोबाईल तथा स्मार्टफोन हा जणू काही मानवी जीवनाचा अत्यावश्यक भाग बनला आहे. किंबहुना अन्य मूलभूत गरजाप्रमाणेच हा फोन देखील एक गरज बनली आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे सहाजिकच जगभरात स्मार्टफोनची मागणी खूप वेगाने वाढत आहे. आता भारतही या स्मार्टफोन बाजारपेठेचे प्रमुख केंद्र बनले आहे.
दरवर्षी विविध कंपन्या आपला एक नवीन स्मार्टफोन बाजारात आणत राहतात. त्यानुसार दोन महिन्यांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान म्हणजेच या वर्षी जूनमध्ये जिओ फोन नेक्स्ट या स्मार्टफोनचे अनावरण करण्यात आले होते. या स्मार्टफोनची भारतात १० सप्टेंबरपासून विक्री सुरू होईल. हा जिओचा सर्वात स्वस्त आणि एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे.
रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी त्यावेळी सभेत म्हणाले होते की, जिओफोन हा जगातील सर्वात परवडणारा स्मार्टफोन असेल. जिओने आधीच दोन फीचर फोन लाँच केले आहेत, तर १० सप्टेंबरला रिलीज होणारा जिओफोन नेक्स्ट हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल. हा स्मार्टफोन जगातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन असेल. तथापि सध्या ४,९९९ रुपयांमध्ये आयटेल ए 53 प्रो भारतात उपलब्ध असलेला सर्वात स्वस्त 4 जी स्मार्टफोन आहे. त्यामुळे नवीन स्मार्टफोनची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
काही मोबाईलधारक अजूनही 2 जी नेटवर्कवर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी भारतात 4 जी हँडसेट अधिक सुलभ करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. रिलायन्स जिओने जाहीर केले आहे की, हा स्मार्टफोन गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला भारतात खरेदीसाठी उपलब्ध असेल. या स्मार्टफोनच्या घोषणेदरम्यान, जिओने आणखी काही बाबी उघड केल्या नाहीत. तथापि, ताज्या माहितीनुसार आगामी परवडणाऱ्या स्मार्टफोनची काही वैशिष्ट्ये दिले आहेत.
संभाव्य वैशिष्ट्ये
ताज्या माहितीनुसार, JioPhone Next Android 11 सह देण्यात येईल आणि HD+ डिस्प्लेसह सिंगल रियर कॅमेरा असेल. स्मार्टफोनमध्ये 1440×720 रिझोल्यूशन डिस्प्ले आणि क्वालकॉमचा एंट्री-लेव्हल 215 चिपसेट असेल त्यात Google च्या कॅमेरा गो आणि डुओ गो अॅप्ससह अन्य सेवा देखील येईल.
अन्य फिचर्स
यात 2 जीबी एलपीडीडीआर 3 रॅमसह 32 जीबी ईएमएमसी 4.5 स्टोरेज असेल. तसेच जिओफोन नेक्स्टमध्ये आणखी वैशिष्ट्ये आहेत ज्यात ड्युअल सिम सपोर्ट, ड्युअल 4G VoLTE, वाय-फाय आणि ब्लूटूथ 4.2 समाविष्ट आहेत. यात कॅमेरामध्ये, JioPhone Next ने 13-MP OmniVision OV13B10 लेन्स पॅक असून ते HDR, FHD+ व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करते आणि त्यात नाईट मोड देखील आहे. गॅलेक्सीकोर द्वारे यात 8 एमपी GC0834W फ्रंट कॅमेरा आहे.