पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – अनेक कंपन्यांनी सध्या आपल्या मोबाईल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन लॉन्च केले आहेत. परंतु अलीकडच्या काळात काही प्लॅन महाग झाल्याने ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे. मात्र मोबाईल जणू काही अत्यावश्यक गरज बनल्याने कोणत्यातरी कंपनीचा प्रीपेड किंवा पोस्टपेड प्लॅन घेणे गरजेचे किंवा आवश्यक ठरते, त्यातच आता जीओने देखील आपल्या ग्रुपमध्ये दरात वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रीपेड प्लॅन महाग असल्याची चर्चा आहे. दरम्यान, देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. या कंपनीने आपल्या एका प्लॅनची किंमत 150 रुपयांनी वाढवली आहे. मात्र केवळ एका प्लॅनसाठी दरवाढ केले गेले असले तरी, उर्वरित रिचार्ज योजना मात्र तशाच आहेत.
हा प्लॅन Jio फोन खास मोबाईल वापरकर्त्यांसाठी आहे. सदर कंपनी 4G फीचर फोन JioPhone खरेदी करण्यासाठी विविध पर्याय ऑफर करते. हा फोन खरेदी करण्यासाठी ग्राहक Rs 1999, Rs 1499 आणि Rs 749 चा पर्याय निवडू शकतात. मात्र, आता कंपनीने 749 रुपयांच्या प्लॅनची किंमत 899 रुपयांपर्यंत वाढवली आहे.
899 ऑफर
ही ऑफर JioPhone चे विद्यमान वापर करणाऱ्या ग्राहकांना लागू होईल. त्याला नवीन JioPhone घ्यायचा असेल, तर त्याला केवळ 899 रुपयांमध्ये Jio फोनच मिळणार नाही, तर सोबतच 1 वर्षाचा अमर्यादित प्लॅन देखील दिला जाईल. यामध्ये वर्षभर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह एकूण 24 जीबी डेटा उपलब्ध आहे. यासोबतच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील आहे.
इतर योजना
आपण 1499 रुपयांच्या प्लॅन नवीन वापरकर्त्यांसाठी लागू होईल, म्हणजेच अगदी 899 रुपयांमध्ये सुविधा मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये नवीन JioPhone व्यतिरिक्त, 1 वर्षासाठी व्हॉईस कॉलिंगसह एकूण 24 GB डेटा आणि Jio अॅप्सचे विनामूल्य सदस्यता देखील उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे, 1999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2 वर्षांसाठी फायदे मिळतील. यामध्ये JioPhone सोबत 2 वर्षांचा प्लॅन मोफत दिला जात आहे. सुमारे 2 वर्षांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह एकूण 48 GB डेटा घेऊ शकता.