मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – “कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी” योजना सादर करणारी जिओ पहिली टेलिकॉम ऑपरेटर कंपनी ठरली आहे.
या योजनेमध्ये दर महिन्याला त्याच तारखेला योजनेचे नूतनीकरण केले जाते. ₹ 259 च्या मासिक योजनेचे प्रत्येक महिन्याच्या निश्चित तारखेला नूतनीकरण करावे लागेल. 1.5 GB प्रति दिन डेटा आणि इतर फायद्यांसह अमर्यादित कॉलिंग सुविधा आता ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. भारतातील सर्वात मोठी दूरसंचार ऑपरेटर, जिओने ‘कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी’ प्रीपेड योजना ही आणखी एक ग्राहक-केंद्रित नवीन योजना सादर करण्याची घोषणा केली आहे
₹259 ची योजना अद्वितीय आहे कारण ती वापरकर्त्यांना 1 कॅलेंडर महिन्याच्या कालावधीसाठी अमर्यादित डेटा आणि कॉलिंग यांसारख्या फायद्यांचा आनंद घेऊ देते. ज्या तारखेला रिचार्ज केले जाईल त्याच तारखेला हा प्लॅन दर महिन्याला रिन्यू करावा लागेल.
हा नवोपक्रम प्रीपेड वापरकर्त्यांना दर महिन्याला फक्त एक रिचार्ज तारीख लक्षात ठेवण्यास मदत करतो.
अशी आहे योजना:
• उदहरणार्थ वापरकर्त्याने ५ मार्च रोजी नवीन ₹259 मासिक प्लॅनसह रिचार्ज केल्यास, पुढील रिचार्ज तारखा 5 एप्रिल, 5 मे, 5 जून इ.
• जिओच्या इतर प्रीपेड प्लॅनप्रमाणे, ₹ 259 चा प्लान एकाच वेळी अनेक वेळा रिचार्ज केला जाऊ शकतो. अॅडव्हान्स रिचार्ज प्लॅन रांगेत जातो आणि सध्याच्या सक्रिय योजनेच्या एक्सपायरी तारखेला आपोआप सक्रिय होतो.
योजना सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनेलद्वारे नवीन आणि विद्यमान वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
फायदे:
• डेटा – 1.5Gb/दिवस (त्यानंतर @ 64Kbps)
• अमर्यादित व्हॉइस कॉल
• 100 SMS/दिवस
• जिओ अॅप्सची मोफत सदस्यता
• वैधता – 1 महिना (दर महिन्याला त्याच तारखेला नूतनीकरण)